Home Cities जळगाव गणेश्वर महादेव मंदिरात महायज्ञ पूजन

गणेश्वर महादेव मंदिरात महायज्ञ पूजन

0
140


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यातील म्हसावद गावातील गणेश्वर महादेव मंदिर गिरणा काठी आज सकाळी 9 ते 11 या वेळेत गावातील आजमान प्राण प्रतिष्ठा व महापूजा यज्ञ पूजन व कळस पूजन करण्यात आले.

मंदिराचा इतिहास असा आहे की सव्वाशे वर्षांपूर्वीच मंदिर आहे. गिरणा नदीच्या पात्रात वाहून आलेले स्वयंभू स्थान आहे. या मंदिराला काही लोक परस्पर देवो भव असे देखील म्हणतात. हे महादेव मंदिर नवसाला पावणारी आहे. या ठिकाणी पूजा साठी 50 लोकांनी सहभाग घेतला व विनोद शास्त्री, मयुर शास्त्री यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. जय भोले ग्रुप  इंदिरानगर हे देखील उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचा दिवस चौथा दिवस आहे व उद्या दि.29 रोजी सकाळी महाप्रसाद भंडारा ठेवण्यात आलेला आहे.

 


Protected Content

Play sound