Home क्राईम महिलेसह मुलांना बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा

महिलेसह मुलांना बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा


Crime l 1

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी गावात जुने भांडणाचे प्रकरण काढत झालेल्या भांडणातून महिलेसह दोघांना मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना १ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोहाडी गावी जयभिमवाडा परिसरात कलाबाई मधुकर वाघ यांचे घर आहे. दरम्यान पूर्ववैमनस्यातून सुनिल शिवाजी भालेराव याने त्याच्या हातातील लोखंडी आसारी कलाबाई यांच्या डोक्यात मारली. तसेच त्याने कलाबाई यांचा मुलगा पंडीत व सुकलाल वाघ या दोघांना अविनाश भालेराव, शुभम ढिवरे,अल्काबाई ढिवरे, मनोज बिर्‍हाडे व शिवदास बिर्‍हाडे यांनी चापट्टाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी जखमी कलाबाई वाघ यांच्या फिर्यादीवरून सुनिल भालेराव, अविनाश भालेराव, शुभम ढिवरे, अल्काबाई ढिवरे, मनोज बिर्‍हाडे, शिवदास बिर्‍हाडे यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound