जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरातील लाकूड पेठ भागात २७ वर्षीय तरुणाला लांकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश जगन कोळी (वय-२७) रा. रेणुकामाता मंदिरासमोर गेंदालाल मिल, हा तरुण आपला भाऊ गौरव व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार २४ मार्च रोजी सायंकाळी ७.३० सुमारास आकाश कोळी याचा भाऊ गौरव याला घेण्यासाठी अकील उर्फ भुऱ्या शेख असगर रा. गेंदालाल मिल हा घरी आला. दरम्यान आकाश कोळि याने गौरवला सोबत का घेवून जातो असे हटकले. याचा राग आल्याने अखिल उर्फ गोऱ्या शेख असगर याने आकाशला लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. जखमी अवस्थेत आकाशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. गुरुवार २४ मार्च रोजी रात्री ११ वाजता आकाश कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अकील उर्फ भुऱ्या शेख असगर याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला शहर पोलीसांनी अटक केली आहे.