Home Cities जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजी ऑनलाइन

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजी ऑनलाइन

0
24

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात सामेवार , 4 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाइन होणार आहे.

सदर लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी आपला अर्ज वैयक्तिक स्वरुपाचेच अर्ज “lokshahidinjalgaon@gmail.com ” या ई- मेल आयडीवर पाठविण्यात यावेत. सार्वजनिक स्वरुपाचे अर्ज सादर केल्यास ते प्रशासकीय अर्ज म्हणून ग्राहय धरण्यात येऊन लोकशाही दिनांत स्विकारले जाणार नाहीत. तसेच अर्जामध्ये Whatsapp no. नमुद करावे. जेणेकरुन सदर लोकशाही दिनाची link व passward अर्जदारास उपलब्ध करुन दिला जाईल. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound