Home क्राईम दुचाकी अपघातातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकी अपघातातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू


accident clipart scooter accident 9

जळगाव प्रतिनिधी । पाळधी गावाजवळ बुधवारी दोन मोटारसायकलीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक तरूण जखमी झाला होता. जखमी झालेल्या तरूणाचा आज गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भिकन दिलीप चौधरी वय ३० रा. झुरखेडा असे मयताचे नाव आहे. पाळधी गावापासून काही अंतरावर दोन मोटारसायकलींचा १ मे रोजी अपघात झाला होता. या अपघातात भिकन चौधरी हे जखमी झाले होते. या अपघातात तरूणाच्या डोक्याला, चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज गुरुवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जखमी भिकन चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा सामान्‍य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound