Home धर्म-समाज फैजपूर येथील विकासो निवडणुकीत माधव भोई बिनविरोध

फैजपूर येथील विकासो निवडणुकीत माधव भोई बिनविरोध

0
21

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका १७ एप्रिल रोजी होत असून १२ जागांसाठी २२ उमेदवारांचे ३२ अर्ज दाखल झाले आहेत. माधव भोई यांची सोमवारी भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातील दोनपैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्‍याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आता ५ एप्रिलपर्यंत आहे. १७  एप्रिल रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. दरम्यान माघारीच्या  दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, यात निवडणूक बिनविरोध होते का  मतदान  होते हे ही स्पष्ट होईल.

 

 


Protected Content

Play sound