
जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या कृष्णा गार्डन या हॉटेलसमोरून तरूणाची दुचाकी लांबविली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपुर येथे दिलीप शिवदास गोपाळ (वय २८) हा तरुण राहतो. शनिवार १९ मार्च रोजी हा तरुण एमआयडीसी परिसरातील कृष्णा गार्डन हॉटेल परिसरात आला होता. यादरम्यान त्याने त्याची (एमएच १९ सीएम ०६४५) या क्रमांकाची दुचाकी कृष्ण गार्डनसमोर उभी केली. काम आटोपल्यावर पुन्हा घराकडे जाण्यासाठी तरुण निघाला असता उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. दोन दिवस दुचाकीचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने अखेर दिलीप गोपाळ याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून सोमवारी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.


