Home धर्म-समाज यावल येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न

यावल येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न

0
60

यावल – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे तिथीप्रमाणे जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्राच्या जयघोषात, जल्लोषात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव संपन्न झाला.

यावल शहरातील जुना भाजीबाजार चौक, बारी वाडा या परिसरात तिथीप्रमाणे संपन्न झालेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी यावलचे तहसीलदार महेश पवार, पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील ( मुन्नाभाऊ ), शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, संतोष खर्चे, पप्पू जोशी, योगेश चौधरी, शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे तालुका उपाध्यक्ष अजहर खाटीक, माजी नगरसेवक सुनिल बारी, सारंग बेहडे, पिन्द्रु पाराशर, सागर देवांग, मयुर खर्चे, विजय कुंभार, किरण बारी, सागर बोरसे, राजू घारू आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. तिथीनुसार छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी शिवजयंती समितीचे अध्यक्ष योगेश राजपूत व उपाध्यक्ष डॉ. योगेश अडकमोल व त्यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound