*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील चितेगाव येथून बकऱ्या चोरून नेत असताना चोरट्याला ग्राम सुरक्षाच्या पथकाने गस्त घालून रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपीला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील चितेगाव येथील अरुण बळीराम कवडे, (वय ४५) हा शेतकरी असून त्यांच्या मालकीच्या काही शेळ्या आहेत. ते नेहमीच घरासमोर बांधलेल्या असतात. मात्र शुक्रवारी १८ मार्च रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास शेळ्यांना चोरून नेतांना चोरट्याला ग्राम सुरक्षाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. व त्याच्याकडून शेळ्या हस्तगत करण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सचिन रमेश धनगर, रा. तांबोळा, ता. चाळीसगांव असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र बी. जी. शेखर व पोलीस अधीक्षक श्री. प्रविण मुंडे यांचे संकल्पनेतून ग्राम सुरक्षा पथक स्थापन करण्यात आली. त्याअनुषंगाने चितेगांव येथील मंगेश शिवराम कवडे, किशोर कैलास जाधव, सचिन प्रेमसिंग राठोड, परेश सुरेश शिंदे, रविंद्र शामा राठोड याची ग्राम सुरक्षा रक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या व पोलिस पाटील कृष्णराव भोसले यांच्या सतर्कतेमुळे हि चोरी होऊ शकली नाही. यामुळे या सुरक्षा रक्षकांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर आरोपीला ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोहेकॉ ओंकार सुतार, पोना भगवान माळी, पोना प्रविण संगेले, पोना दिपक टाकूर यांच्या ताब्यात देण्यात आले असून अरुण बळीराम कवडे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाहीसाठी पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शन लाभले आहेत. अशाच प्रकारची कार्यवाही भविष्यात हि करता यावी व सुरक्षा रक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सन्मान करून सदिच्छापर शुभेच्छा दिल्या.