Home Cities एरंडोल मालखेडे येथील तरूणाची आत्महत्या

मालखेडे येथील तरूणाची आत्महत्या

0
45


कासोदा, ता.एरंडोल प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या मालखेडे येथील कुंदन शांताराम पाटील या युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मालखेडे येथील कुंदन शांताराम पाटील या तरुणाने दि.१मे २०१९या दिवशी दुपारी १ ते ४.३०. या दरम्यान भरदिवसा राहत्या घरात घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. या २८ वर्षीय तरुणाचे २०१७ या वर्षी च लग्न झाले होते. तो नाशिक येथील जय भारत मारोती लिमिटेड या कंपनी मध्ये कार्यरत होता. तो सुट्टी घेऊन घरी आला होता. तर त्याची पत्नी माहेरी गेली असतांना घरात एकटा असतांना या तरुणाने फाशी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. या संदर्भात त्याचे वडील शांताराम दगडू पाटील यांनी कासोदा पोलिसांत खबर दिली असता अकस्मात मृत्यूची नोंद कासोदा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नी.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound