Home क्राईम सावखेडा शिवारातील फिल्टर प्लॅन्ट परिसरात डोहात गुराखीचा आढळला मृतदेह

सावखेडा शिवारातील फिल्टर प्लॅन्ट परिसरात डोहात गुराखीचा आढळला मृतदेह

0
105
death

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा पंपिंग परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराखीचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, गुराखी केशव शंकर इंगळे (वय-५५, रा. सावखेडा ता. जि. जळगाव ) हा गुरे चारण्याचे काम करतो. रविवारी १३ मार्च रोजी सकाळी गुरे चारण्यासाठी घरातून बाहेर पडले. सायंकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोठेही आढळून आले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी उशीरा तालुका पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमवारी १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास केशव इंगळे यांचा मृतदेह गिरणा नदीपात्रातील फिल्टर प्लॅन्ट परिसरातील डोहात आढळून मिळून आला. नदीपात्रात मृतहेद आढळून आल्याची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोलिस कर्मचारी अनिल फेगडे, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत गावकर्‍यांच्या मदतीने मृतदेह डोहातून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी शंकर इंगळे यांनी शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound