Home Cities अमळनेर महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविणाऱ्या महिलेला पकडले; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविणाऱ्या महिलेला पकडले; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

0
36


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानकाच्या आवारात ५० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र महिला चोरट्यांनी चोरून नेतांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका महिला चोराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

 

अमळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या आवारात आशाबाई काशिनाथ पगारे (वय-५०) रा. पाटण ता.शिंदखेडा जि.धुळे या कामाच्या निमित्ताने शनिवार १२ मार्च रोजी अमळनेर बस स्थानकाच्या आवारात आल्या होत्या. अमळनेर बसस्थानक आवारात आशाबाई पगारे ह्या उभे असताना संशयित आरोपी ज्योती संतोष चव्हाण (वय-४५) आणि तिची १२ वर्षे अल्पवयीन मुलगी दोन्ही रा. हसनाबाद ता.भोकरदन जि. जळगाव यांनी आशाबाई यांच्या गळ्यातील १० हजार रुपये किंमतीची सोन्याची मंगळसूत्र तोडले. ही बाब आशाबाई पगारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दोघांना जागेवरच पकडले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली असून यातील संशयित आरोपी ज्योती संतोष चव्हाण तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आशाबाई पगार यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.


Protected Content

Play sound