जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सम्राट कॉलनी येथील ३२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात शुक्रवार ११ मार्च रोजी सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रशांतने आत्महत्या केल्याचे पाहून कुटुंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रशांत रविंद्र मांडोळे (वय-३२) रा. सम्राट कॉलनी असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, प्रशांत मांडोळे हा सम्राट कॉलनीत आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. प्रशांतचे दुमजली घर आहे. शुक्रवार ११ मार्च रेाजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण खालच्या घरात असतांना प्रशांतने वरच्या मजल्यावरील खोली गेला. खोली बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. भावाने आत्महत्या केल्याचे मोठा भाऊ हेमंत मांडोळे याच्या लक्षात आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडील व नातेवाईकांनी मनहेलवणारा आक्रोश केला. त्याला तातडीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.