Home Cities जळगाव विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी प्रा. डॉ. के. एफ.पवार

विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी प्रा. डॉ. के. एफ.पवार

0
65
Dr. K. F. Pawar - KBC NMU Jalgaon


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव पदावर डॉ के. एफ. पवार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्रभारी कुलसचिवपदी डॉ. के. एफ. पवार यांची नियुक्ती केली आहे. ते विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेत प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. प्रा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संपादन केली असून तीन विद्यार्थ्यांचे पीएच.डी.चे प्रबंध सादर झाले आहे.

प्रा. डॉ. के.एप पवार यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ३६ शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासह विविध समित्यांवर काम पाहिले आहे.


Protected Content

Play sound