यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तर प्रदेश, उत्तराखंड, माणिपुर, गोवा, पंजाब या पाच राज्यातील झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीत भाजपा पक्षाने दणदणीत विजय संपादन केल्याने गुरूवारी १० मार्च रोजी यावल भाजपच्या वतीने शहरातील भुसावळ टी पाँईट येथे फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, तत्कालीन नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, जि.प. सदस्या सविता भालेराव, राकेश कोलते, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपुत, अखिल भारतीय सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, यावल कृउबाच्या संचालीका कांचन फालक, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फेगडे, कृउबाचे माजी संचालक देविदास पाटील, गोपाळसिंग पाटील, शहर उपाध्यक्ष राहुल बारी, परिष नाईक, व्यंकटेश बारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/292753909632032