त्रिपुरा राज्यातील मुस्लिम बांधवांवर होणारे अत्याचार थांबवा; बहुजन क्रांती मोर्चाचे निवेदन

यावल प्रतिनिधी । बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराचे पडसात त्रिपुरा राज्यात उमटत आहे. येथील मुस्लिम बांधवांवर होणारे अत्याचार थांबवा अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात काही संघटनांनी तेथील मस्जिद व मदरसांमध्ये दुर्गा पंडाल मधील पाक कुरानाची अवहेलना करण्यात आली होती. त्याचे पडसाद त्रिपुरा राज्यात पडल्याने तेथील भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राजीव भट्टाचार्य, पापिया दत्ता व टिंकु राय यांचे नेतृत्वाखाली त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक मुस्लिम बांधवांना भडकावुन भारतीय दंड संहिता १४४ लागु असतांना देखील विविध माध्यमातून दंगे व अत्याचार सुरू आहे. येथील मुस्लिम बांधवांच्या दुकानाची तोडफोड व लुटमार करून प्राणघातक हल्ले करण्यात येत आहे . या घटनेने त्रिपुरासह आगरतला परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण भारत देशात मुस्लिम बांधवांवर नेहमीच अत्याचार केले जात असल्याने या घटनांवर कायमस्वरूपी पायबंदी लावण्यात यावी या मागणीसाठी यावल बहुजन क्रांती मोर्चातर्फे ८ रोजी यावलचे निवासी नायब तहसिलदार आर.के. पवार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने सईद शाह रहेमान शाह, सादीक खान,  अशयाक शाह,सैय्यद अकील भाई, आसीफ खान ईकबाल खान, जुनेद खान आशिक खान, अजहर शेख मुश्ताक पहेलवान, पप्पुभाई गाजीब खान, अजीज पटेल, जावेद शेख, शोएब खान यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजीक संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content