मुक्ताईनगर येथील स्व. निखिल खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्वर्गीय निखिल खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये थोर वैज्ञानिक डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण व डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम व इतर वैज्ञानिकांना मानवंदना तथा विद्यार्थ्यांच्या विविध वैज्ञानिक उपक्रमातून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारत वर्षात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी 1987 पासून साजरा करण्यात येत आहेत. थोर भारतीय वैज्ञानिक डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचा रमन इफेक्ट ऑफ लाईट हा शोध निबंध सन 1928 प्रकाशित झाला व सन 1930 रोजी त्यांना जगातील विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे नोबेल पारितोषिक देण्यात आले या काळात भारत हा ब्रिटिश पारतंत्र्यात होता. म्हणतात; की व्यक्तीला शरीराने बंदिस्त करता येते परंतु बुद्धि आणि मनाने कोणालाही गुलाम किंवा बंदिस्त करता येत नाही याचे सडेतोड उत्तर ब्रिटीश प्रशासनाला डॉ. सी. व्ही. रमण यांनी दिले असून त्याचे ते ज्वलंत उदाहरण होय.

विज्ञानाविषयी असेल आस्था तर भावी जीवनात नाही सोसाव्या लागणार खस्ता या उदाहरणाला अनुसरून आज शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी या प्रसंगी विविध उपक्रम आपल्या कृतीतून सादर केलेत व भारतज्याप्रमाणे कृषी क्षेत्रात व संस्कृती जोपासण्यात अग्रेसर आहेत त्याचप्रमाणे वैज्ञानिक संशोधनात अग्रेसर होईल अशी ग्वाही या भावी संशोधकांनी दिलीत.

मुलांनी आपल्या सभोवतालच्या गोष्टीचे बारीक अवलोकन करावे व त्यांची चिकित्सक व मार्मिक दृष्टिकोनातून मीमांसा करावी. विज्ञान म्हणजे काय तर निसर्गाने मानवाला उपजत दिलेल्या अवलौकिक गुणांचा शोध व त्याचा वास्तववादी साक्षात्कार सर्वमान्य असतो त्याचा विद्यार्थ्यांनी कास धरून व वैज्ञानिक क्षेत्रात अवलौकिक कार्य व संशोधन निबंध प्रस्थापित करून भारत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवावा

व आपले व आपल्या आई- वडील, गुरुजनांचे नाव उंचवावे ज्याने तुम्हाला संपन्नता व कीर्ती प्राप्त होईल तरच या दिनाचे खरे सार्थक होईल.

वैज्ञानिक कोणी असो, कुठलाही असो, कुठल्याही धर्माचा व जातीचा असो त्याचे उपकार आणि ऋण आपणास फेडता

येत नाही; तर केवळ त्यांना मानवंदना करता येते व त्यांच्या विविध संशोधनातून जीवन सुकर व समृद्ध बनवता येते असे मार्गदर्शन या शुभप्रसंगी शाळेचे प्राचार्य व्ही.के. वडस्कर सर यांनी विद्यार्थ्यांना केले.

विज्ञान दिन थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण आणि भारतीय मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना मानवंदना देऊन तसेच शाळेतील विज्ञान शिक्षक व शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल चौधरी यांनी केले तर शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांचे व भावी संशोधकांचे कौतुक केले.

 

Protected Content