देशात कोरोनाची ओसरली तिसरी लाट  

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | देशात कोरोनाची तिसरी लाट तीन महिन्यांत ओसरली आहे. लसीकरण व चाचण्यांचा विक्रम यामुळे कोरोना आटोक्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 476 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात जानेवारीत महिन्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यादरम्यान दररोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत होते. मात्र आता कोरोनाचे प्रमाण मंदावला असून, जानेवारीच्या तुलनेत कोरोना सक्रिय रुग्णात आता 96 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

देशात सुरुवातीला दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात आदी राज्यांत कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. देशात एकूण बाधितांचा आकडा 4 कोटी 29 लाखांवर गेला असून, 4 कोटी 23 लाख 88 हजार जण कोरोनामुक्त झाले. राष्ट्रीय लसीकरण मोहीम अंतर्गत लसीकरणाचा एकूण आकडा 178 कोटीं पार गेला आहे.

जागतिक महामारी असलेल्या कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून, 9 लाख 81 हजार 729 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये 2 कोटी 89 लाख 6 हजार बाधित तर 6 लाख 50 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे

Protected Content