Home Cities जळगाव भाजपा जिल्हा महानगरतर्फे नवाब मलिक व दाऊत इब्राहिम यांच्या पुतळयाचे दहन (व्हिडिओ)

भाजपा जिल्हा महानगरतर्फे नवाब मलिक व दाऊत इब्राहिम यांच्या पुतळयाचे दहन (व्हिडिओ)

0
67


जळगाव , लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले असताही ठाकरे सरकार त्यांचा राजीनामा घेत नसून त्यांच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र भाजपने तिव्र आंदोलन केले. यानुसार जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जळगाव जिल्हा महानगरतर्फे टॉवर चौक येथे दाऊद इब्राहिम व नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

नवाब मलिक व दाऊत इब्राहिम यांच्या पुतळयाचे दहन टाॅवर चौकात करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी देशद्रोही दाऊद इब्राहिम, नवाब मलिकचा धिक्कार असो धिक्कार असो, राजीनामा द्या नवाब मलिक राजिनामा द्या, ठाकरे सरकारचा धिकार असो अशा घोषणा देऊन टाॅवर चौक दणाणून गेले होते. याप्रसंगी प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष उज्वलाताई बेडाळे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ राधेश्‍याम चौधरी, नितीन इंगळे ,जिल्हा पदाधिकारी राहुल वाघ, महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम, विठ्ठल पाटील, सुभाष सोनवणे, मनोज भांडारकर , प्रकाश पंडित,अ क्षय चौधरी , मंडळ अध्यक्ष परेश जगताप, शक्ती महाजन, नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे ,आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, प्रभाकर तायडे, रेखा पाटील, आनंद सपकाळे, गणेश वाणी अक्षय जेजुरकर, मंगेश जुनागडे, संजय पुरी , योगेश पाटील, जितेंद्र चौथे, मिलिंद चौधरी, राहुल मिस्‍तरी, स्वामी पोद्दार ,सचिन बाविस्कर, रोहित सोनवणे, सागर जाधव, अश्विन सोनवणे, निखिल सूर्यवंशी, निर जैन, भूषण भोळे, गणेश माळी, स्वप्नील साखळीकर योगेश पाटील, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/666981494546879


Protected Content

Play sound