मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याचा निषेध करत राज्यपालांनी माफी मागावी या मागणीसह निषेधाचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने मुक्ताईनगरचे तहसिलदार यांना दिले आहे.
या पत्रात, “महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल वक्तव्य आक्षेपार्ह असून राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीच्या तोंडी ते निषेधार्थ आहे.
त्यांनी केलेलं विधान ताबडतोब मागे घ्यावे व झालेल्या चुकीबाबत छत्रपती शिवाजी राजे व संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मुक्ताईनगरच्या वतीने राज्यपाल महोदय, कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो व आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात याव्यात ही आपणास विनंती करतो. असा आशय अभिव्यक्त केला आहे.
पत्रावर जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा लोकसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, एस सी सेलचे जिल्हाध्यक्ष बापू ससाने, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, शहर अध्यक्ष राजेंद्र पाटील, युवक अध्यक्ष यासह शिवराज पाटील, नंदकिशोर हिरवडे, दिनेश राठोड, घटू पवार, संजय कोळी आदींसह इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.