मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब राज्यातील मराठ्यांना ओबीसींप्रमाणेच सवलती द्या’ या मागणीसाठी छत्रपती संभाजी राजे आझाद मैदानावर लाक्षणिक आमरण उपोषणासाठी बसले असून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजेंच्या उपोषणास लेखी पाठिंब्याचे पत्र तहसिलदार श्वेता संचेती दिले.
अद्यापही मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी लावलेला नाही. अनेकदा सरकारसह चर्चा करुनही मार्ग निघत नसल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक निर्णय घेत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि.२६ फेब्रुवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण सुरुवात संभाजीराजे यांनी केली आहे.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजेंच्या उपोषणास लेखी पाठिंब्याचे पत्र तहसिलदार श्वेता संचेती यांना दिले. या प्रसंगी शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, जिवराम कोळी, शहरप्रमुख प्रशांत उर्फ गणेश टोंगे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, दिलीप पाटील, ललित बाविस्कर, माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, सुभाष पाटील, नगरसेवक संतोष कोळी, पियुष महाजन, निलेश शिरसाठ, संतोष मराठे, आरिफ आझाद, नूर मोहम्मद खान, वसंत भलभले, सोपान तायडे, युनिस खान, दिपक नाईक, जीतेंद्र मुर्हे, संतोष माळी, वैभव कोल्हे, नाना बोदडे, कृष्णा पाटील, पप्पू मराठे, सोपान मराठे, विठ्ठल तळेले, राजेंद्र तळेले, राहुल शेळके, दीपक कोळी, प्रमोद सौंदळे, गौरव दुट्टे, जयेश पाटील, गणेश पाटील, लहू घुये आदिसह शिवसैनिक पदाधिकारी व मराठा समाज बांधव उपस्थित होते.
“संभाजी राजे उपोषणाला बसलेले असून मराठा समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गोर गरीब मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी त्यांनी पुकारलेल्या लाक्षणिक आमरण उपोषणास शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देत आहे” अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.