श्रीक्षेत्र नाटेश्वर महादेवाचा यात्रोत्सव उत्साहात साजरा (व्हिडिओ )

अमळनेर, गजानन पाटील | तालुक्यातील तापीतीरी श्रीक्षेत्र पाडळसरे येथील तापी, बोरी व अनेर नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी असलेल्या पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र नाटेश्वर महादेवाच्या यात्रोत्सव निमित्त दर्शनासाठी महिला व आबालवृद्धांची शनिवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळपासून गर्दी उसळली होती.

 

बेलपत्र व त्रिवेणी संगमाच्या नद्यांचा पाण्याने अभिषेक व पूजन करून नवसपूर्तीसाठी गावातील व बाहेर गावातील श्रद्धाळूंनी मंदिर परिसरात व गावात एकच गर्दी केली होती. दाल बट्टीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून महाप्रसाद वाटप करण्यात येत होता. सायंकाळी ४ वाजता ग्रामपंचायत जवळ सरपंच शुभांगी पाटील व उपसरपंच शिवाजी अण्णा पाटील यांनी ट्रॅक्टरवर सजविण्यात आलेल्या तगतरावची गुलाब व श्रीफळ वाहून पूजन केले. सजवलेला तगतराव नाटेश्वर महादेव मंदिर परिसरात नेऊन देवासमोर हजेरीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवलींगावर बेलपत्र व श्रीफळ वाढवून गावकऱ्यांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करून आपत्तीपासून रक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. तर रात्री उशिरा लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण करीत ग्रामस्थांचे मनोरंजन केले. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतिने परिश्रम घेतले

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/513976616755070

 

Protected Content