शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दुचाकीची चोरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्कींग झोन मधून एकाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीवार २६ फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, अधार तुळीराम दोडे (वय-५२) रा. गोजोरे ता. भुसावळ जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्‌यकीय महविद्यालयात त्यांचे नातेवाईकांना भेटण्यासाठी आधार दोडे हे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता त्यांची (एमएच १९ डीए ८९७७) दुचाकीने आले. दुचाकी महाविद्यालयातील पार्किंगमध्ये पार्क करून लावली व नातेवाईकांना भेटण्यासाठी रूग्णालयात गेले. दुपारी ३ वाजता नातेवाईकांना भेटल्यानंतर घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. संपुर्ण महाविद्यालयातील पार्किंग झोनमध्ये शोधाशोध केली पंरतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. शनिवारी २६ फेब्रुवारी आधार दोडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस नाईक युनूस तडवी हे करीत आहे.

Protected Content