Home Cities जळगाव स्व.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

स्व.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

0
113


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकात स्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी आर्किटेक्ट अरविंद नांदापूरकर, माजी अध्यक्ष सुभाष शौचे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेल्या आहुती व योगदानाचा उजाळा दिला. याप्रसंगी उपस्थितांनी स्वातंत्र्य विर सावरकर अमर रहे, भारत माता वंदे मातरम् चा जय घोष दिला.

याप्रसंगी माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र मराठे, महेश चौधरी, प्रा. भगतसिंग निकम,  राहुल वाघ, मनोज भांडारकर,  प्रकाश पंडित, धीरज वर्मा, नगरसेवक सुचीता हाडा, दीपमाला काळे, धिरज सोनवणे, अतुलसिंह हाडा, मनोज काळे, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, अजित राणे मंडल पदाधिकारी  चेतन तिवारी,शातांराम गावंडे  संजय भावसार  यंशवतभाई पटेल , शामपाटील कुलकर्णी काका आघाडी अध्यक्ष  दीप्ती ताई चिरमाडे, उषाताई  पाठक,प्रा प्रवीण जाधव, हेमंत जोशी,  कुमार श्रीरामे, प्रल्हाद सोनवणे, जयेश पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound