चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मामे भाऊंच्या विवाहात गेलेल्या वयोवृद्धाला काही एक कारण नसताना लाकडी दांड्यांनी जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील प्रबुद्ध नगरातील चंदर रिचपाल चव्हाण (६२) हे मामे भाऊंच्या विवाहात गेले असता तु येथे का आला या किरकोळ कारणावरून दिपक जगदीश गोयर उर्फ भुऱ्या व साहिल प्रेमा गुजराथी दोन्ही रा. नगरपालिका कॉलणी चाळीसगाव यांनी जबर मारहाण केली. त्यापैकी दिपक जगदीश गोयर उर्फ भुऱ्या यांनी लाकडी दांड्यांनी चंदर चव्हाण यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. यात चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. हि घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजता शहरातील हिरापूर रोडवर घडली. दरम्यान चव्हाण यांना गंभीर दुखापती झाल्याने पुढील औषधोपचाराकामी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम- ३२६, ३२३, ५०४ व ३४ प्रमाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहेत.