चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानकाजवळून पोलिसांनी १२ किलो गांजा जप्त करून तिघांना अटक केली आहे.
चोपडा येथील पोलिसांना बस स्थानक परिसरात गांजा असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलीस पथकाने बसस्थानकाजवळील टपरीजवळ ६४ हजार किंमतीचा १२ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला. विक्की झंवर (वय २८, रा. गुजरवाडा, भोकर, ता.जळगाव) याच्याकडे गांजा होता. तो त्याने मनवेल मार्टीन म्हस्के (वय ३३, रा. उल्हासनगर) व जितेंद्र रविंद्र महाजन (वय ३०, रा. उल्हासनगर) यांना विकला. त्याचवेळी चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली.
चोपडा पोलिसांनी या तिघांना अटक करून गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.