Home धर्म-समाज हर्षा यांची हत्या करणाऱ्यांना अटक करून फाशी द्यावी – हिंदुत्ववादी संघटनांंची मागणी

हर्षा यांची हत्या करणाऱ्यांना अटक करून फाशी द्यावी – हिंदुत्ववादी संघटनांंची मागणी

0
22

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथे समस्त हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी यांची शासनाकडे मागणी कर्नाटकात निष्पाप हर्षा यांची हत्या करणाऱ्यांना अटक करून फाशी द्यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून यावल येथील समस्त हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमी बांधव यांनी हे निवेदन तहसिलदार कार्यालयात नायब तहसीलदार आर. डी. पाटील याना दिले.

 

निवेदनात म्हटले आहे की, ‘कर्नाटक राज्यात मागील काही दिवसांपासून देशविघातक शक्तींकडून जाणीवपूर्वक हिजाबचे आंदोलन उभारून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. या आंदोलनाच्या आडून केवळ कर्नाटक राज्यातच नव्हे, तर देशातील अन्य राज्यातदेखील वातावरण कलुषित करण्याचा या देशविघातक शक्तींचा डाव आहे. आतापर्यंत हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात जनतेच्या मालमत्तांची हानी करण्यात आली आहे. आणि आता तर निष्पाप हर्षा यांची हत्याही करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत -जाणीवपूर्वक हिंसक आंदोलन पसरवणार्‍या आणि हत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या संघटनांवर बंदी घालून त्यांच्या प्रमुखांना कारागृहात डांबण्यात यावे. देशात ज्या ज्या हिंदू कार्यकर्त्यांना, हिंदू नेत्यांना अशा धमक्या देण्यात आल्या आहेत, त्यांना योग्य संरक्षण देण्यात यावे. ही हत्या आणि या हिंसक देशद्रोही आंदोलनाचा तपास करण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण केंद्रीय अन्वेषण यंत्रणांकडे सोपवण्यात यावे आणि शीघ्रगतीने या प्रकरणांचा तपास लावण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी चेतन भोईटे, राहुल कोळी, हर्षवर्धन भोईटे, पियुष भोईटे, विशाल पाटील, अभिषेक तायडे, राकेश शिर्के, गुणेश वारुळकर, अरुण सावकारे, ऋषिकेश कोळी, विजय कोळी, भरत भोई, आकाश दांडेकर, सचिन सोनवणे, सागर सोनवणे आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound