Home क्रीडा पाचोरा येथे ‘आमदार चषक’ खुली कबड्डी स्पर्धेस प्रारंभ (व्हिडिओ)

पाचोरा येथे ‘आमदार चषक’ खुली कबड्डी स्पर्धेस प्रारंभ (व्हिडिओ)

0
147


पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । येथील क्रिडा क्रांती कबड्डी मंडळ आयोजित ‘पाचोरा शहरातील मानसिंगका कॉर्नर, रिक्षा स्टॉपजवळ आमदार चषक’ खुला गट जिल्हा कबड्डी असोसिएशन स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे युवानेते सुमित किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

रविवार, दि.२० फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपासून स्पर्धेस सुरुवात झाली. याप्रसंगी मा. नगरसेवक बशीर बागवान, सुरेश देवरे, क्रिडा संचालक मालोजीराव भोसले, न.पा.चे सेवानिवृत्त उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, चंद्रकांत लोढायासह शहरातील कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेत विजयी संघास आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये, नगरसेवक भूषण वाघ यांच्या द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये, पोलिस कॉन्स्टेबल राहुल बेहरे यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये तर विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण मगर यांच्यातर्फे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पर्धेचा अंतिम सामना सोमवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी खेळविला जाणार असून या स्पर्धेत पाचोरा, एरंडोल, जळगांव, भुसावळ येथील ११ संघांनी सहभाग नोंदविला आहे. सामन्यांमध्ये पंच म्हणून जळगांव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख अलेक्झांडर मनी, पंच चैतराम पवार, सुनिल राणे, नयनसागर मनी, आनंद महांगडे, अनिल कोळी, रोशन पाटील, कमलेश पाटील, सुरेश महाजन, विनय चौधरी, शकील शेख हे अचुक कामगिरी करत आहे.

व्हिडीओ लिंक :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3143405852644386


Protected Content

Play sound