Home धर्म-समाज तारखेडा खु” येथे जगदंबा माता देवी यात्रा उत्सव उत्साहात

तारखेडा खु” येथे जगदंबा माता देवी यात्रा उत्सव उत्साहात

0
104

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील तारखेडा खु” येथील जगदंबा माता देवीच्या यात्रा उत्सव नुकताच साजरा करण्यात आला.

दि.१६ फेब्रुवारीला देवीची यात्रा आणि १२ गाड्या ओडल्या गेल्या. दि. १७ रोजी कुस्त्यांची विराट दंगलीला महाराष्ट्र भरातून पहिलवान आले होते.  दि. १८ रोजी बैलगाडी शर्यतीचा (शामिगोंडा) भव्य दिव्य असा सामना रंगला. यावर्षी यात्रेचा निमित्त गावकरी व येणाऱ्या श्रद्धाळू व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले.

यात्रेनिमित्त जगदंबा देवीचा मंदिराला रंग रंगोटो करून लाईटिंगने व फुलांनी सजविण्यात आले होते. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी तारखेडा खु” ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच पती नवल गुजर, उपसरपंच डी. के. पाटील, सदस्य संजय गोसावी, पिंटू मराठे, राजेंद्र पाटील, सुनिल नाईक तसेच गावातील वरिष्ठ सुपडू शिवराम पाटील, आनंदा शिवाजी पाटील, मदन रामचंद्र गुजर, दत्तू पाटील, मदन त्रंबक पाटील, मुबारक पठाण, दाशरथ पाटील, अॅड. अमजद पठाण, नितीन पाटील यांनी अनमोल सहकार्य दिले.

 

 


Protected Content

Play sound