यावल प्रतिनिधी | डोंगरकठोरा येथे कार्यरत ग्रामविकास अधिकारी सि.जी.पवार यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे.
रावेर तालुक्यातील मूळ निभोरा येथील व नंतर नौकरीसाठी चोपडा येथे कुटुंबासह स्थायिक असलेले, सध्या यावल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगर कठोरा तालुका यावल येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सी जी पवार यांचे पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.
ह्रदयविकाराचा झटका आल्याने प्रथम त्यांना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना औरंगाबाद व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले .सी जी पवार हे मनमिळावू व शिस्तबद्ध कार्यकुशल कर्मचारी म्हणून परिचित होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक १९ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून चोपडा येथील लक्ष्मी नगरातील राहत्या घरून सकाळी ८ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघांणार आहे.