पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरा येथे शिवजन्मोत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी डॉ. नागेश गवळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडत शिवचरित्रातुन दुरदृष्ठीची शिकवण आत्मसात केल्यास विजय नक्कीच होतो असे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर कळमसरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक चौधरी, वंदना चौधरी मराठा सेवा संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष योगेश पाटील, मराठा सेवा संघाचे जामनेर तालुका कार्याध्यक्ष विनोद पाटील, मराठा सेवा संघाचे तालुका सचिव दिपक ढोणी, नमन फाऊंडेशनचे दशरथ पाटील, विनोद चौधरी, संभाजी भाऊ धनगर, संदिप पाटील, समाधान पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मंगेश जाधव यांनी केले. तसेच सुत्रसंचालन प्रल्हाद वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजु पोस्ते, पवन भोई, सागर निकम, प्रशांत तुके, सागर चौधरी, निलेश चौधरी, गजानन पाटील, आकाश पाटील, समाधान भोई, नरेश निकम, रीडिंग रुम गृप सदस्य व शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यानी अथक परीश्रम घेतले.