यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे ग्रामपंचायत सरपंच विलास नारायण अडकमोल यांच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचे एकदिवसीय अभिमुखता शिबिर पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे गटनेते तथा काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे हे होते.
कोरपावली येथे माता रमाई जयंती चेऔचित्य साधुव व ग्राम पंचायत मध्ये सरपंचपदी निवडुन आल्याचे वर्षपूर्ती निमित्ताने कोरपावली गावात सरपंच विलास अडकमोल यांनी आयोजित केलेल्या शिबिरात संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ निराधार, निवृत्ती वेतन योजनांच्या लाभार्थ्यांंसाठी एकदिवसीय शिबिर ठेवण्यात आले होते. या शिबिरात गावातील आणी परिसरातील अनेक विधवा, निराधार, दिव्यांग व्यक्ति , वयोवृद्ध महिला व जेष्ट पुरुषांचे प्रकरणे हे संजय गांधी विराधार समितीचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांनी स्वतः शिबिरात या प्रकरणांची तपासणी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून त्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या शिबिरा मध्ये होत असलेल्या गरीब आदिवासी लोकांचे कामे बघून उपस्थित नागरीकांनी संयोजक व आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाला जि.प. गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष तथा पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, संजय गांधी समितीचे सदस्य संदीप सोनवणे, योगिता पाटील, कोरपावलीच्या उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, दहिगाव उपसरपंच किशोर महाजन, राष्ट्रवादीचे ऍड देवकांत पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशन रावेर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष सद्दाम शाह, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, नारायण अडकमोल, पिरण पटेल, मुनाफ तडवी, सिकंदर तडवी, नागो तायडे, देविदास तायडे, कोरपावली चे तलाठी मुकेश तायडे, ग्रामसेवक प्रविन कोळी, ग्राम पंचायत लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी तसेच भरपूर ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी सूत्रसंचालन नारायण अडकमोल यांनी केले तर आभार सरपंच विलास अडकमोल यांनी मानले.