भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणुकींना परवानगी देण्यात आली नसून नियमांचे पालन करून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
शिवजयंती मंडळ पदाधिकार्यांची बैठक डीवायएसपी कार्यालयात आयोजीत करण्यात आली. यात कोरोनाचा धोका पाहता शिवजयंतीनिमित्त कोणत्याही मंडळाने मिरवणूक काढू नये. त्याऐवजी लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवावे. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मिरवणूक काढली तर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.
प्रारंभी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी शासनाच्या सूचनांची माहिती दिली. नंतर मंडळाच्या पदाधिकार्यांनी पोलिस प्रशासनाकडे यंदा नेमकी कशाला परवानगी देण्यात आलेली आहे ? याबाबतची विचारणा केली. यावर शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर, बंद हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळांना करता येईल. मात्र, त्यासाठी देखील पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक गजानन पडघन, एपीआय प्रकाश सूर्यवंशी यांनी केले. स्वप्नील नाईक, रूपाली चव्हाण उपस्थित होते.