Home आरोग्य जिल्ह्यात आज आढळले १२ कोरोना रूग्ण

जिल्ह्यात आज आढळले १२ कोरोना रूग्ण

0
42


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात १२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोना ओसरत असल्याचे आलेख मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

 

तालुका निहाय आकडेवारी

जळगाव शहर-०४, भुसावळ-२, पाचोरा-०१, भडगाव-०१, बोदवड-०४ असे एकुण १२ कोरोना बाधित रूग्ण आज आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ४५५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ६४४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५९० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे आता सध्या २२१रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound