Home Cities जळगाव पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (व्हिडीओ)

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (व्हिडीओ)

0
32

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महापालिकेत नगरसेवकांचे तळ्यात मळ्यात सुरू असतांना आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज या दोन्ही नगरसेवकांनी हातावर शिवबंधन बांधल्याने महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उषा संतोष पाटील आणि शेख हसीना बी दोघा नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गेल्या चार वर्षाच्या कालावधीत वार्डात विकास काम झालेली नाहीत. मात्र पालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यापासून ना.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी येत आहे. त्यामुळे आपल्या वार्डाचा विकास व्हावा या हेतूने शिवसेनेत प्रवेश केल्याची भावना यावेळी दोन्ही नगर सेवकांनी व्यक्त केली.

शिवसेनेत प्रवेश केल्याने वार्डातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील असा आशवाद भाजपातून नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उषा संतोष पाटील आणि शेख हसीना बी दोघा नगरसेविकांनी व्यक्त केला.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/watch/?v=4892266640894171


Protected Content

Play sound