मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्युज, वृत्तसेवा | भारतरत्न लता मंगेशकर यांना पुन्हा व्हेंटिलेटर हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
दि. ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्या डॉ. प्रतित समधानी यांनी सांगितले की, लतादीदींची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात ‘प्रभू कुंज’ जवळील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.