Home क्राईम नवजीवन मंगल कार्यालयाजवळून एकाची दुचाकी लांबविली

नवजीवन मंगल कार्यालयाजवळून एकाची दुचाकी लांबविली

0
104


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जयकिसनवाडी येथील नवजीवन मंगल कार्यालयाजवळून एकाची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, रविंद्र दौलत चौधरी (वय-५४) रा. जुने जळगाव हे खासगी नोकरीला आहे.  शहरातील जयकीसनवाडी येथील नवजीवन मंगलकार्यालयाजवळ त्यांच्या कामाचे ठिकाण आहे. कामावर येण्याजाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ बीए ४७०१) चा वापर करतात. ३१ जानेवारी रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुचाकीने कामावर आले व दुचाकी नवजीवन मंगल कार्यालयासमोर पार्किग करून लावली होती. दिवसभरचे काम आटोपून रात्री ९ वाजता घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी संपुर्ण परिसरास पिंजून काढला दुचाकी कुठेही आढळली नाही. रविंद्र चौधरी यांनी गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.

 


Protected Content

Play sound