जामनेर, प्रतिनिधी | येथील दर्पण प्रतिष्ठान संचलित जीएम रुग्णालयांमध्ये नरसिंग महाविद्यालयाचे शुभारंभ आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲड. शिवाजी सोनार, दर्पण प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक पाटील, नगरसेवक नाना वाणी, उल्हास पाटील, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. राजेश नाईक, डॉ. प्रताप पाटील, डॉ. मयुरी पवार, रामदास योगेश पाटील, जगदीश बैरागी, राहुल बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. शरद पाटील बोलताना म्हणाले की, आरोग्यसेवा माध्यमातून आता नर्सिंग महाविद्यालय सुरू झाले आहे. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना याचा फायदा होणार आहे. नर्सिंगात सुमारे साठ मुला-मुलींनी प्रवेश घेतला असून शंभर पर्यंत मुलांना प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे याचा लाभ जास्तीत जास्त मुला-मुलींनी घ्यावा असे आव्हान नर्सिंग महाविद्यालय शुभारंभ प्रसंगी बोलताना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.