जळगाव प्रतिनिधी । प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तसेच लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलगी गर्भवती होवून तिची प्रसूती झाल्याची संतापजनक घडना समोर आला आहे. यात जन्मलेल्या सात महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. तिचे मयुर रमेश कोळी या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यादरम्यान लग्नाचे आमिष दाखवित अल्पवयीन मुलीला सुरत येथे पळवून नेले होते. तसेच तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी अपहरणासह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संशयित मयुर यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
जामीनावर सुटका झाल्यानंतर मयुर याने पुन्हा अल्पवयीन मुलीशी शारिरीक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. याचदरम्यान मुलीचा पाय भाजला पायावर उपचार सुरु असतांना मुलगी ही गर्भवती असल्याचे समोर येवून तीची प्रसूती झाली. बाळ कमी दिवसाचे असल्याने समोर आले. आज सोमवार, ३१ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन अत्याचार करणार्या संशयित मयुर कोळी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.