जळगाव, प्रतिनिधी | येथील महर्षी श्रृंग ऋषी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा जवळपास १५० नागरिकांनी लाभ घेतला.
महर्षी श्रृंग ऋषी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि. ३० जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिपेठ मधील भागवत भवन येथे करण्यात आले. या शिबिराचे आयोजन संजय व्यास यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या शिबिरात १५० नागरीकांचे तपासणी करण्यात आली. याप्रसंगी प्रदीप जोशी, राधेश्याम व्यास, दिलीप सिखवाल, राजेद्र जोशी, महिला मंडलाच्या मीना पांडे, मीरा जोशी, कमला पांडे, रजनी जोशी, दुर्गा तीवारी, अलका जोशी आदी उपस्थीत होते. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी,उपाध्यक्ष रवी पांडे, सुशील पंडीत, प्रेम जोशी, पंकज शर्मा, इश्वर उपाध्याय, मोहित जोशी आदींनी कामकाज पहिले.