



चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील एका भागात राहणारी ७ वर्षीय चिमुकलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील एका भागात सात वर्षीय चिमुकली ही आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. शनिवार २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चिमुकली ही खेळत असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची माहिती मुलीच्या आईने दिली आहे. दिवसभर मुलीचा शोध घेतला परंतू कोठेही आढळून आली नाही. सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रारी दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहरपोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले करीत आहे.


