Home क्राईम जळगावातील महाबळ परिसरात आग (व्हिडीओ)

जळगावातील महाबळ परिसरात आग (व्हिडीओ)


fire jalgaon

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महाबळ परिसरातील मानस प्लाझा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 201 ला आज सकाळी अचानक आग लागली. सुदैवाने आगीला वेळीच विझवण्यात आल्यामुळे जास्तीचे नुकसान झाले नाही.

 

मानस प्लाझा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 201 मध्ये अॅड.सरोज लाठी हे आपल्या परिवारासह राहतात. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास शॉर्ट-सर्किटमुळे बेडरूमला अचानक आग लागली. सुदैवाने धुरामुळे आग लागल्याचे पटकन लक्षात आहे. नगरसेवक नितीन बर्डे यांनी तत्काळ अग्नीशमन दलाच्या कार्यालयात फोन करून बंब मागवून घेतले. त्यामुळे आग पसरण्याआधीच तिला विझवण्यात यश आले. दरम्यान, या आगीत महत्वाचे पुस्तके व सामान जाळून खाक झाला आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound