बोदवड, प्रतिनिधी | येथे हिंदू हृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
बोदवड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मलकापूर चौफुलीवर हिंदू हृद्य सम्राट बाळासाहेब ठकारे यांची जयंती साजरी करण्यात आली. याठिकाणी तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बाळासाहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. मुक्ताईनगरचे डॉ. जगदीश पाटील, बोदवड येथील साईद बागवान, दिनेश माळी, आनंदा पाटील, सुनील बोरसे, तानाजी पाटील, संजू गायकवाड, गजानन खोडके, दिलीप पाटील नाडगाव, शांताराम कोळी, विजू पाटील, गोविंद पाटील सर, निखिल चौधरी मुक्ताईनगर, राजू जाधव आदी बाळासाहेब ठाकरे प्रेमी उपस्थित होते.