जळगाव प्रतिनिधी । शहरातून पायी जाणाऱ्या तरूणाला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, रईस हनिफ तडवी (वय-३५) रा. सावरकर चौक, शिवाजी नगर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून शिक्षक म्हणून नोकरीला आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रईस तडवी हे पायी जात असतांना समोरून येणाऱ्या (एमएच १९ डीएस ७१५१) दुचाकीने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रईस तडवी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.