Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने ४१४ रूग्ण आढळले; २२१ झाले बरे !

कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने ४१४ रूग्ण आढळले; २२१ झाले बरे !

0
37


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने शुक्रवार सायंकाळी दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात तब्बल ४१४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून ११६ रूग्ण आढळून आले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून आज २२१ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

जळगाव शहर-११६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-७९, अमळनेर-२०, चोपडा-७८, पाचोरा-१७, भडगाव-५, धरणगाव-४, यावल-१, एरंडोल-४, जामनेर-३२, रावेर-०, पारोळा-१६, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४१४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हार ११९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ३१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २२६ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८१ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound