चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांची संख्या चढ उतार आहे. मात्र आज अचानक ३३ बाधीत रूग्ण आढळून आल्याने चाळीसगावकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या कोरोनाने उग्र रूप धारण करत देशात हाहाकार माजवला आहे. यात बांधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान चाळीसगाव शहरातील कोरोना संक्रमितांची संख्या काही दिवसांपासून चढ उतार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानुसार चाळीसगावात तब्बल ३३ बाधीत रूग्ण आढळून आले आहे. यामुळे धोका वाढला आहे. परंतु नागरिकांची बेफीकीर यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना आटोक्यात राहावे म्हणून नगरपालिका व पोलिस प्रशासनाने विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. तरीही नागरिक मोठ्या संख्येने विना मास्क संचार करीत आहेत. यामुळेच रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे हि संख्या घसरणीवर आणण्यासाठी प्रशासन अशा प्रकारे पाहूल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.