मुंबई वृत्तसंस्था | “मी मोदीला मारू शकतो” या नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या वक्तव्यावर विविध प्रतिक्रया उमटत असून भाजपतर्फे निदर्शने करत पटोले यांच्या अटकेची मागणी होत आहे. मात्र ज्या ठिकाणी पटोले यांनी हे वक्तव्य केलं तिथल्या मतदारसंघात नेमकं कोण जिंकलं याची जनसामान्यांना उत्सुकता आहे.
महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान संपन्न होऊन आज त्याचे निकाल लागले. पटोले यांनी ‘पालांदूर’ जिल्हा परिषद मतदार संघात वादग्रस्त भाषण केले तेथे काँग्रेसच्या सरिता कापसे यांनी विजय प्राप्त झाला आहे. या ठिकाणी काँग्रेस जिंकल्यामुळे पटोले यांना दिलासा मिळाला असला तरी या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपातर्फे त्यांच्या विरोधात निषेधाचा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे.