यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील कोळन्हावी येथील जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत २१५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील कोळन्हावी येथील जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंजुषाताई विकास सोळंके ह्या होत्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके , उपाध्यक्ष अश्विनी सोळंके , सदस्य पितांबर सोळंके , ज्योती सोळंके , विद्या सोळंके , ललिता सोळंके , सरला सपकाळे , माजी अध्यक्ष शेखर सोळंके , ग्राम पंचायत सदस्य विकास (गोटू भाऊ) सोळंके , जगदीश सोळंके , कैलास सोळंके , राजू सोळंके , दिपक सोळंके (ग्रा.प.संगणक परिचालक), रतन सोनवणे आऐ उपस्थित होते. दरम्यान माजी अध्यक्ष शेखर सोळंके आणी मुख्या. लालचंद सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक लालचंद साळुंखे , शिक्षक गंगाधर सपकाळे , राजेंद्र साळुंखे , नारायण कुंभार , प्रमोद राणेराजपुत , शीतल बाविस्कर , शहाजी चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नारायण कुंभार यांनी तर आभार राजेंद्र साळुंखे यांनी मानले.