मुंबई प्रतिनिधी | आपल्या सोबतचे सहकारी कलावंत हे इतरांच्या इशार्यावरून आपल्या विरूध्द भूमिका मांडू शकतात अशी शक्यता वर्तवून अभिनेता किरण माने यांनी यासाठी आपण सज्ज असल्याचे समाजमाध्यमातून जाहीर केले आहे.
सोशल मीडियावर राजकीय मत व्यक्त केल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप स्वत: किरण माने यांनी केला आहे. त्यावरून आता मोठा वाद देखील निर्माण झाला आहे. माने यांना मालिकेतून काढून टाकल्यामुळे सोशल मीडयावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. मात्र, आता किरण यांना व्यावसायिक कारणामुळे मालिकेमधून काढल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे मनोरंजनसृष्टीसह राजकारणातही हा वादाचा मुद्दा झालेला आहे.
नुकताच किरण माने यांनी सोशल मीडियावर अजून एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत. अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे पोटार्थी हायेत. प्रॉडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते सत्य सांगतीलच ! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आणि लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणीनये पाहो परतोनी !!! अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.