Home क्राईम वृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी लांबविली; यावल पोलीसात गुन्हा

वृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी लांबविली; यावल पोलीसात गुन्हा

0
49


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील निमगाव रोडवर अज्ञात दोन जणांनी पोलीस असल्याचे सांगत दुचाकी आडवून वृध्दाच्या हातातील १० ग्रॅमची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिलीप पुरूषोत्तम बऱ्हाटे (वय-६८) रा. पाडळसे ता. यावल हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कामाच्या निमित्ताने निमगाव येथे दुचाकीने जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून त्यांची दुचाकी अडविली. आपण दोघे पोलीस असल्याचे सांगत दिलीप बऱ्हाटे यांच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने भुसावळकडे पसार झाले. दिलीप बऱ्हाटे यांनी यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound